बँकेत सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल बँकिंग अर्थात IBPS मार्फत लिपिक पदाच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. भरतीची तपशीलवार अधिसूचना (CRP Clerk XII) अधिकृत वेबसाइट ibps.in वर आज 1 जुलै रोजी प्रसिद्ध केली. आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै असेल. IBPS लिपिक भरती प्राथमिक परीक्षा 2022 अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयोजित केली जाईल. IBPS परीक्षा कॅलेंडर 2022 नुसार, लिपिक भरती परीक्षा 28 ऑगस्ट, 3 आणि 4 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे.
IBPS लिपिक भरती प्राथमिक परीक्षा 2022 मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. IBPS लिपिक भरती मुख्य परीक्षा 28 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. आता या तात्पुरत्या तारखा आहेत. त्यात बदलही होऊ शकतो.
शैक्षणिक पात्रता
IBPS लिपिक भरतीसाठी, उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
संगणक प्रणाली ऑपरेट आणि कार्य करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
– संगणक ऑपरेशन/भाषेतील प्रमाणपत्र/डिप्लोमा/पदवी असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :
मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये मोठी भरती, दहावी उत्तीर्णांना संधी..
सीमा रस्ते संघटनेत दहावी-बारावी पाससाठी सरकारी नोकरीची संधी.. ३०२ जागा रिक्त
भारतीय पोस्टमध्ये 10वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी..
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत तब्बल 800 जागांसाठी पदभरती जाहीर
वयोमर्यादा
लिपिक भरतीसाठी उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे.
शुल्क : ८५०/- रुपये [SC/ST/PWD/ExSM – १७५/- रुपये]
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा