तब्बल 8 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘एक व्हिलन रिटर्न्स’ची कथा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये अर्जुन कपूर, जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि दिशा पटानी दमदार भूमिकेत दिसत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. त्यावेळी त्या कार्यक्रमाला दिशा पोहोचली होती. पण तिला पाहून तिचे फॅन्स निराश झाले. तिचा लूक बदललेला होता.
या कार्यक्रमात दिशा काळ्या रंगाचा ड्रेस घालून पोहोचली होती. तिच्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या. ती सुंदर तर दिसत होतीच. पण तरीही फॅन्सना काही तरी खटकलं. त्यांचं म्हणणं पूर्वी ती नैसर्गिक सुंदर दिसायची. आता तशी दिसत नाही.
दिशा दिसत होती सुंदर
या इव्हेंटमध्ये दिशानं काळ्या रंगाचा co-ord set सेट घातला होता. आपलं टोन्ड शरीर ती दाखवत होती. खरं तर ती या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती
चाहत्यांना लूक बदललेला वाटला
काही फॅन्सना मात्र तिचा चेहरा बदललेला वाटला. या व्हायरल व्हिडिओवर वेगवेगळे कमेंट येत आहेत. काही म्हणतायत, तिनं नाकाची प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. तर काही म्हणतात, ओठांवर शस्त्रक्रिया केलीय. एकानं लिहिलं आहे, ती नैसर्गिक खूप सुंदर दिसायची. आता कशी दिसतेय!