एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे २० वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपीनीयतेची शपथ घेतली आहे आणि आजच मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्री पदी वर्णी लागल्याने एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतं असतांनाचं माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना ट्विटर वरून शुभेच्छा व सदिच्छा दिल्या आहेत.
एकनाथ शिंदेच्या बंडाने महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीच्या अगोदरच राजीनामा द्यावा लागला यामुळे राज्यातील शिवसेनेच्या गोटात मोठा असंतोष होता. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्याने आणि आपल्याच लोकांनी साथ सोडल्याने उद्धव ठाकरे यांनी वेदना झाल्याचे जाहीररित्या सांगितले होते असं असतांना देखील उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत शुभेच्छा देतांना उद्धव ठाकरे लिहतात की,महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!
एकनाथ शिंदे यांनी अखेर भाजपसोबत जात नवं सरकार स्थापन केलं आहे. राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनीही आजच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी आधी फडणवीसांच्या नावाची चर्चा असताना आता अचानक एकनाथ शिंदे यांच्या नावाची थेट मुख्यमंत्री पदाची घोषणा ही बाबही अनेकांसाठी अनपेक्षित होती.आणि त्यात देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणे देखील सर्वांसाठी धाक्काचं आहे.
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 30, 2022