मुंबई,(प्रतिनिधी)- आज मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शनिवार २ जुलै रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
दिनांक २ जुलै २०२२ शनिवार रोजी विधिमंडळाचे अधिवेशन बोलविण्यात आले आहे यावेळी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला दिले आहेत.