जळगाव,(प्रतिनिधी)- गेल्या आठ दिवसापासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेचा आज शेवट झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद आणि विधान परिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे. राज्यात भाजप सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले असून जळगावात भाजपतर्फे टॉवर चौकात व मंडळ -४ (रिंग रोड परिसर) येथे जल्लोष करण्यात आला.
या प्रसंगी दीपक सूर्यवंशी भाजप जळगाव महानगर अध्यक्ष, माजी महापौर सीमाताई भोळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ राधेश्याम चौधरी, अरविंद देशमुख , मनोज भंडारकर, राहुल वाघ, केदार देशपांडे, शक्ती महाजन, धीरज वर्मा रेखा वर्मा, दिप्ती चिरमाडे, रेखा पाटील, आनंद सपकाळे, राजू मराठे, दिनेश पुरोहित, किशोर चौधरी, धीरज सोनवणे, मयूर कापसे, दीपमाळा ताई काळे, मनोज (पिंटू) काळे,मोनी खान, राहुल पुर्णपात्रे, विकी पटेल, शुभम देशपांडे, भुषण काकुस्ते, मनीषा ओझा, चेतन तिवारी, स्वप्निल सागरीकर, आदी पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.