दिल्ली – महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून यासोबतच विधानपरिषद सदस्य पदाचा देखील त्यांनी यावेळी राजीनामा दिला आहे. जनतेशी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद साधला यावेळी त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली.
महाविकास आघाडी सरकारला उद्या अग्नी परीक्षा द्यावीच लागणार आहे असा सर्वोच्च न्यायालयाने उद्या बहुमत चाचणी घेण्याबाबत निर्णय दिला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की मला संख्या मोजण्याचा खेळ खेळायचा नाही त्यामुळे मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर ठाकरे सरकारला उद्या बहुमत सिद्ध करणार की मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला असल्याने उद्या बहुमत चाचणी करण्याची आवश्यकता राहिलेली नाही.