मुंबई | शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी ठाकरे सरकारला उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. अशा वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधातील विश्वासदर्शक ठरावात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचे मत भाजपला देण्याचा विचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे.
काही वेळापूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना फोन करून राजू पाटील यांचे मत देण्याची विनंती केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी हा निर्णय घेत राजू पाटील यांचे मत भाजपला दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा पाय आणखी खोलात गेला आहे.
हे देखील वाचा :
टेलर कन्हैयाच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी रस्त्यावर लोळवून तुडवलं! घटनेचा थरारक Video समोर
सारा अली खानने साडी नेसून इंटरनेटवर लावली आग, एकदा फोटो बघाच
बंडखोर आमदारांकडून आसामच्या पूरग्रस्तांसाठी ‘इतक्या’ लाखांची मदत
आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत ; गुलाबरावांचा संजय राऊतांना प्रत्युत्तर
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे मध्ये जवळीक झाल्याचे पाहायला मिळत होते. राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या भोंग्याच्या प्रश्नावर भाजपने पाठिंबा दिला होता. राज्यसभा निवडणूक आणि विधानपरिषद निवडणुकीत देखील मनसेने आपलं मत भाजप उमेदवाराला दिले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे.