उदयपूर : राजस्थानच्या उदयपूरमध्ये टेलर कन्हैया लालची दोन जणांनी हत्या केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. धारदार शस्त्रानं हिंदू टेलरचा दोघां मुस्लिम युवकांनी गळा चिरला. तालिबानी पद्धतीने गौस मोहम्मद आणि रियाज जब्बार यांनी टेलरचा गळा चिरला होता. त्यानंतर त्यांना उदयपूरपासून 170 किलोमीटर दूर राजसमंद इथं पकडण्यात आलं. त्यांना पकडण्याआधीचा थरारक घटनाक्रम समोर आला.
टेलरची हत्या केल्यानंतर उदयपूरच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातले पोलीसही सतर्क झालेले होते. राजसमंद पोलिसांनी दोघांनाही पकडण्यासाठी भीम-देवगढ परिसरात यंत्रणा उभी केली होती. आधीच नाकाबंदी करण्यात आलेली. दोघाही मारेकऱ्यांचं लोकेशन पोलिसांनी ट्रेस केलेलं होतं. बाईकवरून या दोघांनी टेलरची हत्या करुन पळ काढला होता.
https://twitter.com/ManiSAiyarINC/status/1541825105075965952
नॅशनल हायवे 8 वर भीम इथं असलेल्या डाकबंगल्याच्या ठिकाणी पोलिसांना नाकाबंदी केली गेली. पोलिसांना बघात दोघंही आधीच सतर्क झाले. बाईकवर असलेल्या मारेकऱ्यांनी पळ काढण्यास सुरुवात केली. बदनौर येथील चौकातून कॉलेजच्या समोरुन जात हायवेवर आले. तिथून ते पुढे अजमेरच्या दिशेने निघाले होते. यावेळी भीम-देवगढ पोलिसांनी थरारक पाठलाग करत मारेकऱ्यांना बाईकवर संध्याकाळी साडे सहा वाजता गाठलं आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या.
काय आहे प्रकरण?
नुपूर शर्मा हिच्या समर्थनात पोस्ट केल्यामुळे या टेलरची गळा चिरुन दोघांनी हत्या केली होती. हत्येनंतर या दोघांनी व्हिडीओही पोस्ट केला होता. इतकंच काय तर हत्येआधीच आपण टेलरचा जीव घेणार आहोत, आणि नंतर व्हिडीओही अपलोड करु, असा थेट इशाराच मारेकऱ्यांनी आधी दिलेला होता. या धक्कादायक घटनेचे पडसाद उदयपुरात उमटू लागलेले आहेत. त्यानंतर आता परिस्थिती अधिकच चिखळतेय. इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. जयपूरमधून दोघा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना उदयपूरमध्ये सुरक्षेखातर पाठवण्यात आलंय.