उद्या बहुमत चाचणी, मी हजर राहणार, उद्या मुंबईत पोहोचणार- एकनाथ शिंदे
मुबंई,(प्रतिनिधी)- शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्या नंतर व सुप्रीम कोर्टाच्या दिलासामिळाल्या नंतर भाजप गोटात देखील राजकीय हालचालीना वेग आला आहे, काल रात्रीच भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेतेदेवेंद्र फडणवीस यांनी सरकार अल्पमतात असल्याचं पत्र दिलं होतं व बहुमत सिद्ध करण्याची मागणी केली होती. दरम्यान आज राज्यपाल यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं असून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यपाल यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रानुसार उद्या विधानसभेची बहुमत चाचणी झाल्यास यावेळी ठाकरे सरकार बहुमताच्या अग्निपरीक्षेत यशस्वी होईल की नाही याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.
उद्या बहुमत चाचणी, मी हजर राहणार, उद्या मुंबईत पोहोचणार- एकनाथ शिंदे
बहुमत चाचणी करिता बंडखोर आमदार उद्या मुंबईत पोचणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना दिली असून एकनाथ शिंदे सुद्धा फ्लोअर टेस्टसाठी जाणारजी प्रक्रिया आहे ती करणार असल्याचं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
आज राज्यमंत्रीमंडळाची बैठक
बहुमत सिद्ध करण्याआधी आज राज्य मंत्री मंडळाची बैठक होणार असून यावेळी काही महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.