जळगाव ;- म्हसावद जवळील वाकडी येथे एका युवकाने मंदिर परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली . यामुळे गावात खळबळ उडाली आहे. आनंदा बाजीराव गायकवाड वय ३२ असे मृत युवकाचे नाव आहे .
आनंद गायकवाड हे कामावरून रात्री उशिरा घरी आले . यानांतर ते मांगीलाल महाराज मंदिरात झोपण्यास गेले . मात्र सकाळी ६ वाजेच्या सुमारास भगव्या ध्वजाच्या साहाय्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले.त्यांना वैद्यकीय महाविद्याल; येथे आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले . यावेळी नातलगांनी एकच आक्रोश केला . याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी,दोन मुले,भाऊ असा परिवार आहे.