पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका शुल्लक कारणावरून 18 वर्षीय तरुणीचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण चाकण हादरलं आहे. घरात कोणीही नसताना आरोपी विष्णूकुमार सहा याने प्रीती सहा हिची गळा दाबून हत्या केली आहे. या हत्येची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी आरोपी विष्णूकुमार सहा याला अटक केली आहे.
का केला खून ?
विष्णूकुमार आणि हत्या (Murder) झालेल्या प्रिती सहा हीची आई, एकाच कंपनीमध्ये काम करत होते. प्रितीच्या आई विष्णूकुमारशी बोलत नव्हती. आई बोलत नाही, म्हणून विष्णूकुमारशी प्रितीनेही बोलणं थांबवलं होतं. यामुळे विष्णूकुमारच्या मनात राग होता. विष्णूकुमारशी कोणत्या तरी कारणावरून वाद झाल्याने प्रितीच्या आईने आरोपी विष्णूसोबत बोलणं थांबवलं होतं.
हे देखील वाचा :
राजकीय घडामोडींना वेग ; एकनाथ शिंदे यांचा राज ठाकरेंना फोन
सरकारी दुकानातून रेशन घेण्याच्या नियमात मोठे बदल होण्याची शक्यता! जाणून घ्या नवीन तरतुदी
गुलाबराव पाटील आता पुन्हा पानटपरीवर बसतील ; संजय राऊतांची टीका
कोकणासह उत्तर महाराष्ट्रावर राहणार कृपादृष्टी ; हवामान विभागाने वर्तवला अंदाज
पुण्यातील खडकी कन्टोमेंट बोर्डमध्ये ‘या’ पदांसाठी भरती ; 1 लाखाहून अधिक पगार मिळेल
उलगडा कसा झाला?
प्रितीची आई बोलत नाही, याचा राग आधीत विष्णूकुमारच्या डोक्यात होता. आधीच चिडलेल्या विष्णूकुमारने सकाळी घरात कुणीही नसताना प्रितीचा गळा दाबला आणि तिचा खून (Murder) केला. यानंतर तो त्याच्या खोलीत जाऊन शांतपणे बसला होता. यावेळी घराशेजारी राहणाऱ्या एका लहान मुलीने विष्णूकुमार प्रितीचा गळा दाबतोय हे पाहिलं होतं. तिला संशय आला. तिने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी विष्णूकुमारला या प्रकरणी अटक केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.