मुंबई : शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यातील शिवसैनिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. कार्यकर्त्यांकडून बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच सर्व पोलिस ठाण्यांना शहरातील सर्व राजकीय कार्यालयांमध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. अधिकारी स्तरावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रत्येक राजकीय कार्यालयाला भेट देऊन त्यांच्या सुरक्षेची खात्री करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईतील सर्व अपर पोलीस आयुक्त व सर्व पोलीस उपआयुक्तांची बैठक घेतली. त्यावेळी निर्देश देण्यात आले.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गटाने राजकीय वर्तुळात धुमाकूळ घातल्याने शिवसैनिकांनी मोर्चा काढण्याचा पवित्रा घेतला. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांना गद्दार बंडखोरांना सोडणार नाही, असा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तसेच एकनाथ शिंदे समर्थकांनी लावलेले बॅनरही फाडण्यात आल्याने शिंदे गट आणि शिवसेनेचा संघर्ष आणखीनच पेटला आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईतील सर्व अपर पोलीस आयुक्त व सर्व पोलीस उपआयुक्तांची बैठक घेतली. बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. मुंबई शहरातील सर्व राजकीय पक्षांचे कार्यालय, मंत्री, खासदार, आमदार यांचे कार्यालय, निवासस्थान शाखा या ठिकाणी बंदोबस्त लावण्याबाबत सूचना दिल्या. त्याचप्रमाणे स्थानिक राजकीय व्यक्तीसोबत समन्वय ठेवून आगाऊ माहिती घेण्याच्या सूचना दिल्या. सध्या चालू असलेले राजकीय कार्यक्रम, बैठका या ठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवण्याबाबत सांगण्यात आले. विशेष शाखेने सोशल मीडियावर लक्ष ठेवून संबंधितांना आवश्यक माहिती त्वरीत देण्यास सांगितले.कोणताही राजकीय पक्ष कायदा हातात घेणार नाही, हिंसा करणार नाही आणि तोडफोड करणार नाही, याबाबत आवश्यक सूचना बैठकीत दिल्या.
हे देखील वाचा :
गुलाबराव पाटील आता पुन्हा पानटपरीवर बसतील ; संजय राऊतांची टीका
कोकणासह उत्तर महाराष्ट्रावर राहणार कृपादृष्टी ; हवामान विभागाने वर्तवला अंदाज
पुण्यातील खडकी कन्टोमेंट बोर्डमध्ये ‘या’ पदांसाठी भरती ; 1 लाखाहून अधिक पगार मिळेल
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीबाबत सरकार करू शकते मोठी घोषणा
कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्टर, बॅनर लागणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगितले. आवश्यक प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने सर्वांनी सजग राहून कर्तव्य करणे अपेक्षित आहे. या सूचना आपल्या अधिपत्याखालील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना देण्याबाबत सांगण्यात आले. मुंबई शहरात कलम 144 आरपीसी हे प्रतिबंधात्मक आदेश 10 जुलै पर्यंत पाळले जातील याबाबत सूचना देण्यात आल्या.