मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 40 समर्थक आमदारांसह पक्षातच बंडखोरी केली. यामुळे बंडखोर आमदार आणि शिवसैनिक यांच्यात हा संघर्ष दिसून येत असून अनेक ठिकाणी तोडफोडीच्याही घटना घडतायत. याच सगळ्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी घेत मुंबईमध्ये आजपासून 10 जुलैपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहेत.
10 जुलै पर्यंत मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जमावबंदी लागू करण्यात आल्याचे समजत आहे. तसेच आमदार खासदारांच्या कार्यालयाबाहेर देखील पोलिसांची सुरक्षा आहे. आमदारांच्या बंदमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
हे पण वाचा :
एका आठवड्यात सोन्याचा भाव 1000 रुपयांनी घसरला, वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव
एकनाथ शिंदे गटाचे नाव ठरले ; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
एकनाथ शिंदेंनी ट्विट करत सरकारवर केला हा मोठा आरोप
शिंदे गटाला बसणार धक्का! ‘त्या’ 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस
आज सकाळीच बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील बालाजी नगर येथील कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. इथून पुढे संपूर्णमहाराष्ट्रात या प्रकारे आंदोलन करत गद्दाराना अद्दल घडवली जाईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला आहे. तानाजी सावंत हे सत्ता असताना शिवसेनेत आले त्यांनी सर्व पद उपभोगली आणि आता पक्षाशी गद्दारी केली, असा आरोप शिवसैनिकांनी केला होता.