मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगात राज्याचे राजकारण कोणत्या दिशेने वळणार आहे, हे कोणालाच माहीत नाही. दरम्यान, शिवसेना-ठाकरे नाव न वापरता जगून दाखवा असं आव्हान कालच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना दिलं होतं. आता अशातच शिंदे गटानं नाव निश्चित केलं आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, शिंदे समर्थकांनी त्यांच्या वेगळ्या गटाचे नाव निश्चित केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या पक्षाने ‘शिवसेना – बाळासाहेब ठाकरे गट’ हे नाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या बंडखोर गटात सध्या जवळपास ४० आमदार ठामपणे उभे आहेत. अशा स्थितीत लवकरच शिंदे समर्थक या नावाबाबत औपचारिक घोषणा करू शकतात.
हे पण वाचा :
एकनाथ शिंदेंनी ट्विट करत सरकारवर केला हा मोठा आरोप
शिंदे गटाला बसणार धक्का! ‘त्या’ 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत तब्बल 800 जागांसाठी पदभरती जाहीर
10वी पास उमेदवारांना ECIL मध्ये नोकरीची संधी, उद्याची शेवटची तारीख
जाणकारांच्या मते, या नावावरून आता शिवसेनेचे बाळासाहेब गट आणि दुसरे (उद्धव) गट असे दोन भाग होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा स्थितीत यातून अधिकाधिक शिवसैनिक आपल्या गटाशी भावनिक जोडले जातील, असा एकनाथ शिंदे गटाचा अंदाज आहे.