मुंबई : शिंदे गटाची शिवसेनेसोबत केलेली बंडखोरी महाविकास आघाडी सरकारच्या जिव्हारी आली आहे. एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे जवळपास ४० हुन अधिक आमदार गुवाहाटीमध्ये आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहेत. अशातच एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारने आपल्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप केला आहे. त्यांनी याबाबतच पत्र ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना पाठवलं आहे.
आम्ही शिवसेना विधिमंडळ पक्षाचे निवडून आलेले सदस्य आहोत, जे 2019 मध्ये झालेल्या 14 व्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या संबंधित मतदारसंघातून आमदार म्हणून विधिवत निवडून आले आहोत
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे.#MVAisAntiShivsena pic.twitter.com/lX2qjVTxGM
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2022
आम्ही सध्याचे विद्यमान आमदार आहोत, तरीही आमच्या निवासस्थानी तसेच आमच्या कुटुंबातील सदस्यांना प्रोटोकॉलनुसार प्रदान केलेली सुरक्षा बेकायदेशीरपणे काढून घेण्यात आली आहे. एक सूड म्हणून. NCP आणि INC गुंडांचा समावेश असलेल्या MVA सरकारच्या मागण्या मान्य करण्यासाठी आमचा निश्चय तोडण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे, हे सांगण्याची गरज नाही..असही म्हटलं आहेत.
एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्री आपल्या समर्थक आमदारांसह गुपचूप सूरतला निघून गेले होते. मध्यंतरीच्या काळात एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या आमदारांसह आपला मुक्काम गुवाहटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये हलवला होता. सध्या या हॉटेलमध्ये शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष आमदार असल्याची माहिती आहे. आसाम सरकारकडून या सगळ्यांच्या सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षिततेसाठी रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर स्थानिक पोलीस आणि केंद्रीय पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील सुरक्षाव्यवस्थेत कोणतीही कमतरता नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांचा आरोप पाहता या आमदारांच्या महाराष्ट्रात राहत असलेल्या कुटुंबीयांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.