पुणे : राज्यात सुरुवातीला अनेक ठिकाणी मान्सूनने पाठ फिरविली होती. मात्र, 22 जूनपासून राज्यातील पर्जन्यमानात बदल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पेरण्यांना वेग आला आहे. दरम्यान मुंबईसह कोकण भागात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, पश्चिम महाराष्ट्रात जिल्ह्यांसह जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात आगामी पाच दिवसात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर उर्वरीत राज्यामध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आला आहे. कोकणात ऑरेंज अलर्ट असणार आहे. तर ठाणे, पालघर, मुंबई, रायगड या जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यासह मध्य महाराष्ट्रात नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर येथे विजांसह पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे.
हे पण वाचा :
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत तब्बल 800 जागांसाठी पदभरती जाहीर
10वी पास उमेदवारांना ECIL मध्ये नोकरीची संधी, उद्याची शेवटची तारीख
दरम्यान, मराठवाडामधील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली येथे पाऊस होईल. तर विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीत पावसाचा अंदाज आहे. तर, नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर येथेही चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला आहे.