मुंबई | शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जबरच धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडा नंतर शिवसेनेचे आक्रमक होत मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण 12 जणांची आमदारकी रद्द करण्याची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष रहरी झिरवळ यांच्याकडे सादर केली आहे.
सदर आमदारांना पक्षाच्या विधिमंडळ बैठकीला हजर राहण्याची नोटीस देऊनही ते बैठकीला गैरहजर राहीले त्यामुळे आम्ही विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांना त्यांचे सदस्यत्व कायदेशिररित्या रद्द व्हावे यासाठी पीटीशन दिली आहे. अशी माहिती शिवसेना नेते अरविंद सावंत यांना दिली आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. सरकारने केली ही मोठी घोषणा
आनंदाची बातमी : खाद्यतेलाच्या किमतीत घट, जाणून घ्या काय आहेत दर
मोठी बातमी ! शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, मात्र..; संजय राऊतांचे खळबळजनक वक्तव्य
10वी पास उमेदवारांनो तुम्हालाही रेल्वेत नोकरी हवीय? मग लगेच करा अर्ज
कोणकोणत्या आमदारांचा समावेश
1) एकनाथ शिंदे
2) यामिनी जाधव
3)महेश शिंदे
4) लता सोनावणे
5)प्रकाश शिंदे
6) संजय शिरसाठ
7) अब्दुल सत्तार
8)भरत गोगावले
9) संदिपान भुमरे
10) अनिल बाबर
11) प्रकाश सुर्वे
12) तानाजी सावंत