धुळे – .पहाटेच्या वेळी बाहेरगावाहून आलेल्या शिक्षिकेचे मंगळसूत्र दोन मोटारसायकलस्वार तरुणांनी धूमस्टाईलने लांबवत पोबारा केला. यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे. शहरात धुम स्टाईलने मंगल पोत चोरीची हि दहावी घटना आहे
.धुळ्यात झाशी राणी चौकात ट्रँव्हल्स पाँईट जवळ कोमल अजिक्य सुर्यवंशी वय.27.या शिक्षिका खाजगी प्रवासी बस मधुन रिक्षेची वाट पाहत असतानाच दोन मोटरसायकल स्वार धुम स्टाईलने जवळ आले.त्यांच्या गळ्यातील ११ ग्रँम सोन्याची चेन किंमत ३७ हजार रुपये हिसकवुन घटनास्थळाहुन पोबारा केला. मंगल पोत चोरी प्रकरणी शिक्षिका महिलेने शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंद केली आहे.