मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटानं ताणून धरलेल्या विषयात आता शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं दिसून येतंय. कारण अनैसर्गिक आघाडी नको, असा आग्रह धरणाऱ्या एकनाथ शिंदेंचं म्हणणं शिवसेना मान्य करायला तयार आहे. मात्र शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी 24 तासांत मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी व मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
‘वर्षा’ निवासस्थानात आज शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे आमदार कैलाश पाटील आणि नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांनी सूरतमधून कशी सुटका केली, याबाबत अनुभव मांडले. त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, बाहेर असलेल्या शिवसेना आमदारांना जर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि वेगळा विचार करावा असे वाटत असेल तर तोदेखील विचार करू. मात्र, तुम्ही आधी 24 तासात मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी. मुंबईत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करावी असे आवाहन राऊत यांनी यावेळी केले.
हे पण वाचा :
10वी पास उमेदवारांनो तुम्हालाही रेल्वेत नोकरी हवीय? मग लगेच करा अर्ज
उद्धव ठाकरेंच्या भावनिक भाषणाला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर, वाचा जसंच्या तसं पत्र
आई रागावल्याने दहावीतील विद्यार्थिनीने उचललं टोलचे पाऊल
उद्धव ठाकरे नव्या अडचणीत ! या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, पत्रकारांना व इतरांना व्हॉट्सअॅपवर हॉटेलमधील फोटो, व्हिडिओ पाठवण्यापेक्षा प्रत्यक्षात येऊन चर्चा करावी. आमचा गुवाहाटीमधील 21 आमदारांसोबत संपर्क झाला असल्याची माहिती यावेळी राऊत यांनी दिली.