मुंबई : एकीकडे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. आता अशातच शिवसेनेचे आणखी सहा आमदार सध्या नॉट रिचेबल आहेत. हे सहा आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून ते आज गुवाहाटीला पोहोचतील अशी माहिती आहे. आमदार मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, दादा भुसे, दीपक केसरकर, संजय राठोड आणि दिलीप लांडे यांच्याशी संपर्क झालेला नाही.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठी उभा केला. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे ४१ पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. आणखीही काही आमदार शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याचं समोर येत आहेत. एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीच्या हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये मुक्कामाला आहेत.
हे पण वाचा :
मुंबईला निघालो सांगून थेट गुवाहाटीकडे रवाना ; जळगावच्या आणखी एक आमदाराची शिंदेंना साथ
.. तर मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार ; उद्धव ठाकरेंचे बंडखोर आमदारांना आवाहन
या तारखेपूर्वी भरा इनकम टैक्स रिटर्न, अन्यथा..
उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का ! शिवसेनेचे आणखी सहा आमदार नॉट रिचेबल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व बंडखोर आमदारांना समोर येण्याचं आवाहन केलं आणि तुम्ही सांगाल तर मुख्यमंत्रिपद सोडून देईन असा विश्वास दिला. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबतच्या सर्व आमदारांची बैठक घेतली आणि विरोध आणखी तीव्र केला. “हिंदुत्त्व फॉरएव्हर” अशा आशयाचं ट्वीट करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं.