मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. शिवसेनेचे जे नाराज आमदार आहेत त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट येऊन भेटण्याचे आव्हान केले. तसेच मला एकाही आमदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री पद नको तर मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार असून आजच मी मातोश्रीवर मुक्काम हलवणार. मला सत्तेचा मोह नाही, असही ते म्हणाले.
आपल्याला नाईलाजाने काही निर्णय घ्यावे लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जावं लागलं, असे ठरल्यानंतर तीन पक्षाची बैठक झाली. त्यात ठरले. त्यानंतर शरद पवार यांनी मला बोलावले आणि सांगितले. हे ठरले पण जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. मी म्हटले, पवार साहेब मस्करी करता का? मी महापालिकेत फक्त महापौरांना शुभेच्छा द्यायाल गेलो. नगरसेवक नसताना मी कसा मुख्यमंत्री होणार हे बोललो. त्यावर पवार म्हणाले. तुम्हीच जबाबदारी घ्या. ठीक आहे, घेतो म्हटलो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदेंऐवजी उद्धव मुख्यमंत्री का झाले, याविषयी उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाइव्हमध्ये उलगडून सांगितले आहे. लाचारी आणि मजबुरी न स्वीकारता सर्व शिवसैनिकांच्या साथीने हे सर्व केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘शिवसेना प्रमुखांना दिलेले वचन पूर्ण करणारच’ ते म्हणाले, की शिवसेनेचे आमदार गायब सुरतला गेले. गुवाहाटीला गेले. त्यात मला पडायचे नाही. परवा निवडणूक झाली. त्यावेळी आमदार हॉटेलात होते. मी म्हटलंही कोणती लोकशाही आहे. आपल्या माणसांना एकत्र ठेवावे लागते. अरे हा कोठे गेला तो कुठे गेला. त्यावर शंका घेतली जात होती. लघवीला गेला तरी शंका घेतो. म्हणजे लघुशंका. मला काहीच अनुभव नव्हता. पण जे काही घडलं.
मी जिद्दीने काम करणारा माणूस आहे. मी शिवसेना प्रमुखांना दिलेले वचन पूर्ण करणारच म्हणून रणांगणात उतरलो, असे ते म्हणाले. ‘माझ्यावर विश्वास टाकला’ मुख्यमंत्रीपदाबाबत ते म्हणाले, की शरद पवारांनी विश्वास टाकला, सोनिया गांधींनी विश्वास टाकला. त्यांनी सहकार्य केले. प्रशासनानेही सहकार्य केले, असेही ते म्हणाले. पद महत्त्वाचे नाही, तर तुम्ही जे काम करता ते महत्त्वाचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.