जळगाव : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं असताना आता आणखी एका आमदाराने एकनाथ शिंदेंची साथ देण्याचं ठरवलं आहे. मुक्ताईनगर येथील अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील तातडीने मुंबईकडे रवाना झाले होते. पण आता ते थेट गुवाहाटीला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गळाला आणखी एक आमदार लागला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आपण मुंबईकडे जात असल्याचं सांगत थेट गुवाहाटीला निघाले आहेत. खरंतर, त्यांच्या मुलाची प्रकृती बिघडल्याने त्याला पाहण्यासाठी आमदार पाटील हे रात्रीचे मुक्ताईनगरात आले होते. मुलाची भेट घेतली त्यानंतर त्यांना मुंबईवरून फोन आल्यानंतर ते तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. पण यानंतर आता ते गुवाहाटीला जात असल्याची माहिती आहे.
हे पण वाचा :
शिवसेनेनंतर काँग्रेसमध्ये नाराजी, हा बड्या नेता राजीनामा देऊ शकतात
वर्षा बंगल्यावर आज न आल्यास.. बंडखोर आ. शंभूराज देसाईंना शिवसेनेची नोटीस
मोठी संधी.. 70,000 रिक्त जागांसाठी SSC नोटीस जारी, जाणून घ्या संपूर्ण तपशील
आमदार चंद्रकांत पाटील यांचा जळगाव विमानतळावरील फोटो प्राप्त झाला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी जळगाव विमानतळावर खाजगी विमान बोलावले. या विमानाने ते रवाना झाले आहेत विमानात बसणे पूर्वीचा त्यांचा फोटो हाती लागला असून नेमके ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले की गुवाहाटीकडे याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते ही गेले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील तीन सेनेचे आमदार यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्यासोबत फुटले आहेत. यात पाचोराचे आमदार किशोर पाटील, पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील व चोपड्याचे आमदार लताबाई सोनवणे यांचा समावेश आहे.