शिवसेनेशी बंड करून समर्थक आमदारांना सुरत येथे घेऊन गेल्यानंतर संजय राऊत यांनी आमदारांचे अपहरण व मारहाण झाल्याचं संजय राऊत म्हणाले होते, दरम्यान आमदाराला मारहाण झाली नसल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केला होता.
त्याच बरोबर शिवसेनेचे आमदार नितेश देशमुख सुद्धा हे कालपासून शिंदे यांच्यासोबत सुरत मध्ये होते या घडामोडी दरम्यान त्यांना हृदयवीकाराचा त्रास झाल्याने सुरत येथील रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले होते. तर नितेश देशमुख यांना बळजबरीने तिथं ठेवल्या जात असल्याचं त्यांच्या परिवाराने देखील शंका उपस्थित केली होती.
अखेर नितेश देशमुख नागपुरात दाखल…
एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवहाटी येथे पोहचलेले शिवसेना आमदार नितेश देशमुख आज सकाळी नागपूर येथे पोहचले असून त्यांनी सर्व प्रकारबद्दल मोठा गौप्य केला आहे. नागपूर विमानतळवर आमदार नितेश देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितलं की माझ्या दंडावर बळजबरीने इंजेक्शन टोचले,मला हार्ट अॅटक आलाच नाही असा आमदार नितेश देशमुख यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. मी शिवसैनिक आणि राहणार, मी उद्धव ठाकरे साहेबांचा सैनिक आहे मी उद्धव साहेबांसोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे.