आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली असून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करून म्हटलं आहे की राजकीय घडामोडीचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने… संजय राऊत यांनी केलेलं सूचक ट्विट महाविकास आघाडी सरकार कोसळणार असं संकेत मानले जात आहे.
शिवसेना(shivsena)नेते एकनाथ शिंदे (eknath shinde)यांच्यासोबत शिवसेनेचा एक मोठा गट असून एकनाथ शिंदेसोबत एकूण ३५ आमदार व काही अपक्ष आमदार गेल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. आज एकनाथ शिंदे सोबत असलेल्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांकडे देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर दुसरीकडे भजपाच्या गोटात सरकार स्थापण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे.
मुख्यमंत्री राजीनामा देण्याची शक्यता…
शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे व समर्थक आमदार हे त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्यास व महाविकास आघाडीकडे सरकार टिकविण्यासाठी बहुमत नसल्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022