जळगाव, (प्रतिनिधी)- शिवसेना(shivsena)नेते एकनाथ शिंदे (eknath shinde)यांच्यासोबत शिवसेनेचा एक मोठा गट असून एकनाथ शिंदेसोबत एकूण ३५ आमदार गेल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला असतांना त्या बंडखोर आमदारांचा शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ वृत्तपत्रातून समाचार घेतला असून आजच्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर मेनलीड बातमीतून शिवसेनेचे वीर ‘धर्म’ विसरले !असं म्हटलं आहे.
सामना वृत्तपत्राच्या बातमीत पुढे म्हटलं आहे की, सरकार पाडण्यासाठी भाजपने टाकलेल्या या जाळय़ात शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे सहज फसले. ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणि कारवाईला घाबरून शिंदे यांच्यासोबत गद्दार आमदार सुरतला पळाले. म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या सोबत पळालेल्या आमदारांसोबत बंडखोर आमदारांना आता ‘गद्दार’ असल्याचं देखील म्हटलं आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला असून बंडखोर आमदारांना आता गोहाटी येथे हलविण्यात आले आहे.त्यामुळे एकनाथ शिंदे यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी किती आमदार आहेत याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.