केंद्र सरकारमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच ७० हजारांहून अधिक पदांसाठी पात्र उमेदवारांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) त्यांच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर नोटीस जारी करून ही माहिती दिली आहे. जारी केलेल्या नोटीसमध्ये विविध विभागांतील ७० हजारांहून अधिक रिक्त पदांसाठी लवकरच भरती सुरू होईल, असे म्हटले आहे. याबाबतची सविस्तर अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे.
अधिकृत सूचनेनुसार, “भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, कर्मचारी निवड आयोग 70,000 अतिरिक्त रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. विशिष्ट परीक्षांच्या अधिसूचना लवकरच वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या जातील. उमेदवारांना आयोगाच्या वेबसाइटला वेळोवेळी भेट देत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हे पण वाचा :
नोकरीची मोठी संधी.. भारतीय सर्वोच्च न्यायालयात 210 जागांसाठी भरती
तरुणांनो संधी सोडू नका.. BSF मध्ये बंपर भरती, दरमहा 1,12,400 पर्यंत पगार मिळेल
संधी सोडू नका… NHM मार्फत नागपूर येथे 159 जागांसाठी भरती, 60,000 रुपये पगार मिळेल
IDBI मध्ये नोकरी मिळविण्याचा आज शेवटचा चान्स, 1544 पदे रिक्त, पगार असेल 63000
ही पदे कोणत्या पदासाठी आहेत हे नोटीसमध्ये दिलेले नाही. एसएससीद्वारे दरवर्षी होणाऱ्या सीजीएल किंवा सीएचएसएल भरतीसाठी किंवा त्यांच्यासाठी वेगळी परीक्षा घेतली जाईल की नाही, हे दिलेले नाही. भरतीची पातळी काय असेल, अर्जाची विहित पात्रता काय असेल आणि उमेदवारांची निवड कशी केली जाईल, हे अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच कळेल. या दरम्यान, उमेदवारांनी SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर लक्ष ठेवावे.
अधिकृत सूचना पाहण्यासाठी : येथे क्लिक करा