मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीला मोठा झटका बसण्याची शक्यता असून शिवसेनेचे हेविवेट नेते एकनाथ शिंदे हे नाराज असून सोमवारी संध्याकाळी पासून ते नॉट रीचेबल आहेत. सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे यांच्यासोबत 11 आमदार सूरतमध्ये असल्याची माहिती सुरूवातीला आली होती. मात्र नाराज आमदारांची संख्या मोठी आहे. शिवसेनेचे 30 ते 35 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची माहिती समोर आली आहे.
उस्मानाबादेतील शिवसेनेचे उमरगा लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले हे नॉट रिचेबल आहे. आमदार चौगुले हे गेली 3 टर्म सलग सेनेचे आमदार असून ते एकनाथ शिंदे समर्थक म्हणून ओळख जातात. सलग 3 वेळा आमदार असतानाही मंत्रिपद न मिळाल्याने चौगुले नाराज होते.चौगुले यांचे दोन्ही नंबर बंद आहेत.
हे पण वाचा :
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप ; शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदेंसह अनेक आमदार नॉट रिचेबल
नाथाभाऊ इज बॅक ! एकनाथ खडसे विजयी, पुन्हा एकदा करणार विधानभवनात एंट्री
नोकरीची मोठी संधी.. भारतीय सर्वोच्च न्यायालयात 210 जागांसाठी भरती
बुलडाण्यातील मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमूलकर आणि बुलडाणाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड नॉट रिचेबल आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार संजय नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोकणमधील २ आमदार सोबत आहे. ठाण्यातील 2 आमदार सोबत आहे, अशी माहिती समोर आली आहे.