मुंबई – विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) निवडणूक निकाल नुकतेच जाहीर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना 27 मत मिळाल्याने विजयी झाले असून खडसे समर्थकांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
चूरशीच्या विधान परिषद निवडणूकीत एकनाथराव खडसेंच्या उमेदवारीची संपूर्ण राज्यभारत मोठी चर्चा होती. खडसेंच्या पराभवासाठी विरोधकांनी कंबर कसली होती मात्र या निवडणुकीत खडसेनीं विजय मिळवला आहे.