मुंबई : मुंबईत एका तरुणाला गर्लफ्रेंडचा हात पकडणंही भारी पडलं आहे. तब्बल 8 वर्षांनंतरही कोर्टाने त्याला शिक्षा ठोठावली आहे 20 सप्टेंबर 2014 साली एका तरुणीने आपल्या तरुणाविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. दोघंही एकमेकांचे शेजारी होते. जिन्यावर त्याने आपला हात धरून स्वतःकडे खेचल्याचा आरोप तिने लावला.
या प्रकरणात एफआयआरही नोंदवण्यात आला होता. त्यानंतर तरुणाला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्याला जामीनावर सोडण्यात आलं होतं. या घटनेला 8 वर्षे उलटली. त्यानंतरही कोर्टाने याप्रकरणी सुनावणी करत आपला निकाल दिला आहे. त्याला एक वर्षाच्या तुरुंगवासासह पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
हे पण वाचा :
विधान परिषद निवडणुकीबाबत चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा; म्हणाले..
अग्निवीरांनासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा आणखी एक मोठा निर्णय
तरुणांनो संधी सोडू नका.. BSF मध्ये बंपर भरती, दरमहा 1,12,400 पर्यंत पगार मिळेल
आमदार संजय ‘सांभाळून घ्या.. आपलं सरकार आहे ; ना.पाटील
ही घटना 2014 सालातील आहे. त्याला बरीच वर्षे झाली आहेत. आता आपलं लग्न आता दुसऱ्या महिलेशी झालं आहे आणि आपल्याला दोन वर्षांचा एक मुलगाही आहे. त्यामुळे या प्रकरणात आपली सुटका करावी, अशी मागणी या तरुणाने केली. पण कोर्टाने त्याचं काहीच ऐकलं नाही. हे प्रकरण महिलेच्या अब्रूशी संबंधित असल्याचं सांगत त्याच्या सुटकेला कोर्टाने स्पष्टपणे नकार दिला.