भुसावळ : अडीच वर्षांपासून बंद असलेली जनरल तिकिटाची सुविधा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. येत्या २९ जूनपासून मध्य रेल्वेच्या १६५ गाड्यांमध्ये जनरल तिकिटांची सुविधा सुरू होणार आहे. मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेमध्ये जनरल तिकीट घेऊन प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. तसेच मासिक पासधारकांनाही सुविधा देण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे रेल्वे प्रवासावर अनेक बंधने आली होती. नंतर टप्प्याटप्प्याने हे निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यानंतर देशातील विविध मार्गांवर काही स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या. कोरोनाकाळात खबरदारीचा उपाय म्हणून ट्रेनमधील गर्दी टाळण्यासाठी जनरल तिकीट बंद करण्यात आले होते. केवळ ज्यांनी सीट आरक्षित केली आहे, अशांनाच फक्त रेल्वे प्रवास करता येत होता.
हे पण वाचा :
आनंदाची बातमी : खाद्यतेलाच्या किंमतीत १० टक्क्यांपर्यंतची कपात
हतनूर पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी ; धरणाचे ४ दरवाजे उघडले
राज्यात दहावीचा निकाल 96. 94 टक्के, मुलींनी मारली बाजी
Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग हे पदार्थ रोज खा
मात्र सध्या कोरोना कमी झाल्यानंतर जनरल तिकीट सेवा पुन्हा सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. अशातच आता मध्य रेल्वेने जनरल तिकिटाची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भुसावळ विभागातून धावणाऱ्या १६७ गाड्यांमधून जनरल तिकिटाची सुविधा मिळणार आहे. या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांना सामान्य तिकीट खिडकीतून तिकीट काढून प्रवास करता येणार आहे.