मुंबई : दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. दरम्यान आता सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. देशातील प्रमुख तेल उत्पादकांनी पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफूलाच्या तेलाचय्या किंमतीत १० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. खाद्य तेल लीटरमागे सरासरी २० रुपयांनी स्वस्त होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दरात घट आणि स्थानिक पातळीवरील खाद्य तेलाची मुबलक उपलब्धता यामुळे हे दर कमी झाले आहे
देशातील प्रमुख खाद्यतेल उत्पादक कंपन्या अदाणी विल्मर आणि रुची इंडस्ट्रीज, जेमिनी एडिबल्स अँड फॅट्स इंडिया,
गोकुळ अॅग्रो रिसोर्सेज आणि एन. के. प्रोटीन, विजय सॉल्वेक्स, मोदी नॅचरल्स, गोकुळ री-फॉयल अँड सॉल्वेंट, या तेल उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या दरात कपात केली आहे. त्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे पण वाचा :
राज्यात दहावीचा निकाल 96. 94 टक्के, मुलींनी मारली बाजी
Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग हे पदार्थ रोज खा
महाविकास आघाडीच्या त्या निर्णयावर शेलारांचा टोला, खडसेंबाबतही बोलले..
सूर्यफुल तेलाच्या किंमतीत 10 ते 15 रुपये प्रति लिटर तर सोयाबीन तेलाच्या किंमतीत 5 रुपये प्रति लिटर कपात करण्यात आली आहे. त्याबाबतची माहिती इंडियन वेजिटेबल ऑयल प्रोडयुसर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर राव यांनी दिली. सूर्यफूल तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्याने तेलाची उपलब्धता मुबलक आहे. त्यामुळे या किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे.