भुसावळ । काल सायंकाळी राज्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी काहीस सुखावला आहे. दरम्यान, हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणाचे आज दुपारी ४ दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात मान्सून दाखल होऊन आठवडा उलटला तरी देखील काही ठिकाणी पावसाने अद्यापही दमदार हजेरी लावली नाही. तर काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. दरम्यान हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्र परीसरात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आज शुक्रवार दुपारी १२ वाजेला प्रकल्पाचे ४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रकल्पातून 3955 क्यूसेक वेगाने पाणी तापी नदी पात्रात सोडण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागाने कळविले आहेत.
हे पण वाचा :
राज्यात दहावीचा निकाल 96. 94 टक्के, मुलींनी मारली बाजी
Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग हे पदार्थ रोज खा
महाविकास आघाडीच्या त्या निर्णयावर शेलारांचा टोला, खडसेंबाबतही बोलले..
आदित्य यांचे लवकर शुभमंगल होवो आणि.. ; भाजप नेत्याने नेमक्या काय दिल्या शुभेच्छा
दरम्यान, हतनूर धरणांमधून पाणी प्रवाह सोडण्यात येत असून हतनूर धरणाचे खालील गावांमध्ये सूचना देऊन तापी नदी पात्रांमध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये अथवा कोणी तापीनदी पात्रांमध्ये जाऊ नये असे आवाहन करण्यात आले.