मुंबई : बारावी निकालानंतर आज शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर होत आहे. आज दुपारी एक वाजता निकाल ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना दहावीचा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना नेमकं कुठे आणि कसा निकाल पाहता येणार? त्यासाठी फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. जाणून घ्या
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले होते.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
कुठे पाहाल निकाल?
पुढील संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल –
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in