भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. एएआय मध्ये एकूण ४०० जागांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार १४ जुलै २०२२ पर्यंत नोकरीसाठीचा अर्ज करू शकणार आहेत. इच्छुक उमेदवार आज १५ जूनपासून अर्ज दाखल करू शकणार आहेत. यासाठी उमेदवारांना aai.aero या संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करता येईल.
पदाचे नाव : एअर ट्रॅफिक कंट्रोल ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह
पात्रता काय?
उमेदवाराचं १४ जुलै २०२२ पर्यंत वय २७ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तर शासनाच्या निर्णयानुसार विविध जाती-जमातींसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. यानुसार एससी आणि एसटी प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची सवलत तर ओबीसी प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून भौतिकशास्त्र आणि गणितासह B.Sc किंवा कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी असणं आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराला 10+2 स्तरावर बोललं आणि लिहिल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेच किमान प्रवीणता असणं आवश्यक आहे.
अर्ज शुल्क
इच्छुक उमेदवारांना १,००० रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. अनुसूचित जाती/जमाती/महिला उमेदवारांना फक्त ८१ रुपये भरावे लागतील. तर PWD आणि AAI मध्ये एक वर्षाचं शिकाऊ प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या शिकाऊ उमेदवारांना कोणतेही शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये नोकरीची संधी.. त्वरित करा अर्ज
मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर येथे 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीचा चान्स
बॉम्बे हायकोर्टात नोकरी करण्याची संधी.. अर्ज कसा कराल??
8वी, 10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी.. तब्बल 4710 जागांची होणार भरती
निवड प्रक्रिया
ऑनलाइन परीक्षेतील त्यांच्या कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल आणि त्यांना दस्तऐवज पडताळणी/ आवाज चाचणीसाठी बोलावलं जाईल. निवडलेल्या उमेदवारांचे रोल नंबर AAI वेबसाइटवर जाहीर केले जातील.
पगार किती?
कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी निवडल्या जाणाऱ्या अर्जदारांना दरमहा ४० हजार ते १ लाख ४० हजार पर्यंत वेतन दिलं जाईल.
अधिक माहितीसाठी भारतीय विमानतळ प्राधिककरणाच्या अधिकृत वेबसाइट https://www.aai.aero/ वर भेट देऊन माहिती मिळवू शकता.