नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात आज मंगळवारी व्यापार आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमती जाहीर झाल्या आहेत. आज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोन्या-चांदीचे दर आज खाली आले आहेत. आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 50725 रुपयांना मिळत आहे, तर एक किलो चांदीचा दर 60164 रुपयांवर गेला आहे.
सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोनदा जारी होत असल्याची माहिती आहे. एकदा सकाळी आणि दुसरी संध्याकाळी. ibjarates.com नुसार, 995 शुद्धतेचे सोने आज 50522 रुपयांना विकले जात आहे. 916 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 46464 रुपयांवर आला आहे. 750 शुद्ध सोन्याची किंमत आज 38044 रुपये झाली आहे. याशिवाय 585 शुद्धतेचे सोने आज 29674 रुपयांना मिळत आहे. 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 60164 रुपयांवर आला आहे.
हे पण वाचा :
राज्यसभेसाठी पंकजा मुंडेंना उमेदवारी का दिली नाही? फडणवीसांनी केलं पहिल्यांदाच भाष्य
तरुणांसाठी खुशखबर.. येत्या 18 महिन्यात 10 लाख सरकारी नोकऱ्या; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये नोकरीची संधी.. त्वरित करा अर्ज
अरे वा! ट्रॅक्टर खरेदीवर सरकार देणार ५०% सबसिडी, कसा मिळेल फायदा जाणून घ्या
सोने-चांदी किती स्वस्त झाले?
सोन्या-चांदीच्या दरात आज घट झाली आहे. आज 999 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने 710 रुपयांनी, 995 शुद्धतेचे सोने 707 रुपयांनी, 916 शुद्धतेचे सोने 650 रुपयांनी स्वस्त झाले आहे. याशिवाय 750 शुद्ध सोन्याचा भाव 532 रुपयांनी तर 585 शुद्ध सोन्याचा भाव 415 रुपयांनी घटला आहे. त्याच वेळी, जर आपण 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीबद्दल बोललो तर आज त्याची किंमत 748 रुपयांनी कमी झाली आहे.