मुंबई : गेल्या आठवड्यात महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र आता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक सुरु झाली आहे. कारण आठवड्यातच दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यंदा ऑफलाईन परिक्षा घेण्यात आल्यात त्यात या परीक्षांना थोडा उशीर झाला. त्यामुळे यंदा बोर्डाचे निकालही उशिराच लागणार अशी माहिती मिळत होती. मात्र नेहमीप्रमाणे यंदाही बोर्डाचे निकाल हे वेळेतच लागणार आहेत. गेल्या आठवड्यात बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या आठवड्यात दहावी परीक्षेचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आता निकाल कसा लागणार आणि किती मार्क्स मिळणार यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती आहे. मात्र निकालाचं कुतूहलही आहे.
महाराष्ट्र स्टेट दहावी बोर्डाच्या निकालाच्याआधीच अकरावी, पॉलीटेक्नीक आणि इतर कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे विद्दयार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा न करताच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मात्र निकाल लागल्यानंतर प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव आतापासूनच करून ठेवावी लागणार आहे.
असा चेक करा निकाल
इयत्ता 10वीचा महाराष्ट्र SSC निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी सुरुवातीला www.mahresult.nic.in या महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल पोर्टलच्या अधिकृत वेबपेजला भेट द्या.
SSC परीक्षेसाठी MSBSHSE निकालासाठी अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर SSC परीक्षेचा निकाल हा पर्याय येईल ज्यावर विद्यार्थ्यांना पुढील वेब पेजवर भेट देण्यासाठी क्लिक करा.