जळगाव : कौटुंबिक वादातून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी जळगावातील हरिविठ्ठल नगरातील धनगर वाड्यात घडलीय. गणेश आत्माराम बडगुजर (वय- ४८) असे मृताचे नाव असून याबाबत परिसरात खळबळ उडाली.
गणेश बडगुजर यांच्या घरात गेल्या दोन महिन्यापासून लहान मुलीचे लग्न झाल्यापासून भांडण सुरु होते. यामुळे पत्नी प्रतिभा बडगुजर ह्या भांडणाला कंटाळून मोठ्या मुलीकडे राहत होत्या. तिथून त्या जैन इरिगेशन येथे कामाला जात होत्या. परंतू आज त्या मोठ्या मुलीसोबत घरी आल्या होत्या, गणेश यांच्यासह बहीण व आई घरी होते. यावेळी पुन्हा काही भांडण झाले. गल्लीतील लोकांनी दोघ दाम्पत्यास समजविण्याचा प्रयत्न केला.
हे पण वाचा :
ठरलं तर..! १३ जूनपासून धावणार सुरत-भुसावळ एक्सप्रेस, वेस्टर्न रेल्वेची घोषणा
केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी.. गृह मंत्रालयात विविध पदांसाठी भरती जाहीर
सावधान ! देशात कोरोनाची चौथी लाट? 24 तासांत इतके रुग्ण आढळले
मात्र, पत्नी व मोठी मुलगी १० वाजता घरातून निघून गेली. यापाठोपाठ मृताची आई व बहिण ही घरातून बाहेर गेले असता गणेश यांनी गळफास लावण्याची घटना घडली. बहिणीला सोडून आल्यानंतर मृताची आईने दार उघडले असता घरात छोट्याशा दोरीने गळफास घेतल्याचा अवस्थेत दिसला, यावेळी मुताची आई यांनी एकच आक्रोश केला हे ऐकून गल्लीतील लोक घटनास्थळी धावले. दरम्यान, अद्यापही मृतदेह घरात पडून आहे. रुग्णवाहिकेला फोन केला असून पोहचली नाही.