नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असून 21 जुलै रोजी देशाला नवा राष्ट्रपती मिळणार आहे. 29 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल.
सध्याचे राष्ट्रपती असलेले रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लागणार असून केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राष्ट्रपती निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 15 जून ते 29 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर 2 जुलै पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. निवडणूक बिनविरोध न झाल्यास 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
हे पण वाचा :
खुशखबर.. मान्सून पुढच्या ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होणार : IMD अंदाज
‘या’ अभिनेत्री केवळ अभिनयापुरत्या मर्यादित नसून अशा गोष्टी एकत्र करतात
इंडिया फोर्ब्ज ने घेतली डॉ.भूषण मगर यांच्या कार्याची दखल
जळगाव जिल्ह्यात ३ दिवस वादळी पावसाचा अंदाज
या निवडणुकीसाठी संसदेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. मागील वर्षी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जवळपास 50 टक्के मतदान एनडीएचे उमदेवार रामनाथ कोविंद यांच्या बाजूने झाले होते. काही प्रादेशिक पक्षांनीदेखील कोविंद यांना पाठिंबा दिला होता.