मुंबई : विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार असून या पार्श्वभूमीवर राज्यात खूप महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. राष्ट्रवादीकडून दोन नावे जाहीर करण्यात आली आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने खडसे यांचे राजकारणात पुनरागम झाले आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने खडसे अर्ज दाखल करणार आहेत.
दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यांनतर खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास टाकला. विधान परिषदेसाठी माझे नाव राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने जाहीर केल्याबद्द्ल मी त्यांचे अभिनंदन करतो.
हे पण वाचा :
इंडिया फोर्ब्ज ने घेतली डॉ.भूषण मगर यांच्या कार्याची दखल
जळगाव जिल्ह्यात ३ दिवस वादळी पावसाचा अंदाज
विधान परिषद निवडणूक : अखेर एकनाथ खडसेंचे राजकारणात पुनरागमन, राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर
बारावी पास झाल्याने मित्रांसोबत सेलिब्रेशनला गेला, अन्..
क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी गुडन्यूज ! RBI गव्हर्नरने केली ‘ही’ घोषणा
गेली ४० वर्षे भाजपामध्ये निष्ठेने काम केले, विधान परिषदेसाठी आश्वासन दिले, पण बऱ्याच वेळा अन्याय झाला, अशी भावना निर्माण झाली. त्यानंतर अशा अनेक प्रसंगामुळे मला नाईलाजाने भाजपाचा त्याग करुन राष्ट्रवादीमध्ये यावे लागले. लागलं. शरद पवार यांनी आज माझ्यावर विश्वास टाकला. तो विश्वास सार्थ करेन आणि ज्या भागात भाजपा वाढीसाठी उभे आयुष्य काढले त्या भागात राष्ट्रवादी पक्ष वाढविणार,’ असे माजी मंत्री खडसे म्हणाले.