जळगाव : राज्यात मान्सूनच्या आगमनासाठी विलंब होत असला तरी पुढच्या ५ दिवसांत संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात ९ ते ११ जून दरम्यान मृगसरी काेसळणार आहेत.
मान्सूनच्या प्रवाहात बदल होतोय. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी परिसरात मान्सूनपूर्व सरींना गेल्या दोन दिवसांपासून सातत्यानं हजेरी लावली आहे. कोकणात आता लवकरच मान्सूनचं आगमन होण्याची शक्यताय. दरम्यान, उर्वरीत महाराष्ट्रात पुढीत पाच ते सात दिवस पूर्व मोसमी पाऊस बरसेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिलीय.
हे पण वाचा :
हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात ९ जून राेजी ५ मिली मीटरपर्यंत पाऊस हाेण्याचा अंदाज वर्तवला आहे. १० जून राेजी १८ तर ११ जून राेजी १० मिलिमीटर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात वाऱ्याचा वेगही १८ ते २१ किमी दरम्यान राहणार आहे. या काळात आर्द्रता सकाळी ७० टक्क्यापर्यंत तर दुपारी ३० टक्यापर्यंत राहू शकते.
तापमान पुन्हा चाळिशीत
गेल्या चार दिवसांमध्ये वाढलेले तापमान पुन्हा खाली येत आहे. ४३ अंशापर्यंत गेलेला पारा पुन्हा खाली उतरला आहे. ८ जून राेजी जिल्ह्यात ४०.८ अंश सेल्सिअस तापमान नाेंदविले गेले आहे.