नवी दिल्ली : देशात कोरोना पुन्हा हातपाय पसरवू लागला आहे. देशात गेल्या 24 तासांत 7,240 नवे रुग्ण आढळून आलेत.त्यामुळे ही कोरोनाच्या चौथ्या लाटेची सुरुवात तर नाही ना, अशी शंका घेतली जातेय. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आता आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाल्यात. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही राज्यांना खबरदारी घेण्याचे आदेश जारी करण्यात आलेत.
आज गुरुवारी (9 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार तब्बल सात हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण देशात आढलून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशातच नव्हे तर राज्यातही कोरोना रुग्णवाढीनं चिंत वाढवली आहे. राज्यातील सर्व लोकांना पुन्हा एकदा मास्कचं वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. तसंच पात्र असणाऱ्यांना बुस्टर डोस घेण्याचंही आवाहन केलं जातंय.
हे पण वाचा :
विधान परिषद निवडणूक : अखेर एकनाथ खडसेंचे राजकारणात पुनरागमन, राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर
क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी गुडन्यूज ! RBI गव्हर्नरने केली ‘ही’ घोषणा
…म्हणून पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारली; चंद्रकांतदादांचे महत्वाचे विधान
कुठलीही परीक्षा न देता थेट संधी.. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटरमध्ये मोठी भरती
राज्यातही पुन्हा कोरोनाचं टेन्शन वाढलंय. बुधवारी राज्यात दोन हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची भर पडली होती. त्यातील अर्ध्याहून अधिक रुग्ण हे एकट्या मुंबईत आढळून आले होते. बुधवारी राज्यात 2701 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर मुंबईत 1765 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली होती. दरम्यान, मुंबईसह उपनगरांमध्येही कोरोनाचा धोका वाढतोय. पालघर, ठाण्यासह नागपूर, पुण्यातही रुग्णसंख्या वाढतेय.