मुंबई : राज्यात 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपने बुधवारी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीकडूनही उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
या यादीत एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत रामराजे निंबाळकर यांना सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खडसे आणि निंबाळकर हे दोघेही आज उमेदवारी अर्ज भरतील.
राज्यात एकीकडे राज्यसभा निवडणुकीवरून नाट्यमय घडामोडी घडत असताना, दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. अखेर जाहीर करण्यात आलेल्या यादीत खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा :
क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी गुडन्यूज ! RBI गव्हर्नरने केली ‘ही’ घोषणा
…म्हणून पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारली; चंद्रकांतदादांचे महत्वाचे विधान
कुठलीही परीक्षा न देता थेट संधी.. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटरमध्ये मोठी भरती
विधानसभा सदस्यांमधून परिषदेवर 10 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यात भाजप 4, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी 2 असे एकूण 10 आमदार निवडले जाऊ शकतात. भाजपच्या चार उमेदवारांनी अर्ज भरला असून पाचव्या उमेदवार उमा खापरे यादेखील आज अर्ज भरतील. तर राष्ट्रवादीकडून खडसे आणि निंबाळकर हे दोघेही आज उमेदवारी अर्ज भरतील.