भंडारा : काल बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यानंतर पास झाल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थ्यांनी सेलिब्रेशन सुरू केलं. अशात एक विद्यार्थी पास झाल्याने आपल्या मित्रांसोबत सेलिब्रेशनला गेला.
या दरम्यान, वैनगंगा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील माड़गी रेल्वे पुलाखाली ही घटना घडली आहे. निखिल महादेव बालगोटे वय 17 वर्ष राहणार गुरूनानक नगर तुमसर असे मृतकाचे नाव आहे.
बारावीचा निकाल लागला असून मृतक निखिलला 57 टक्के गुण मिळाले होते. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी निखिल निकाल लागताच मित्रांसोबत माडगी येथील वैनगंगा नदी पात्राजवळ सेलिब्रेशन करायला गेला. दरम्यान त्यांना पाण्याचा मोह आल्याने त्यांनी पोहन्याचा मनोसोक्त आनंद घेतला. दरम्यान निखिल हातपाय धून्याकरिता पाण्यात गेला असता त्याच्या तोल जाऊन तो नदी पात्रात बुडाला.