मुंबई : राज्यातील महाविलद्यालयातील प्राध्यापकांसाठी आणि तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील महाविद्यालयातून तासिका तत्त्वावर शिकवणाऱ्या प्राध्यापकांचं मानधन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निकषानुसार वाढवण्याचा निर्णय झाला.तशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरवरून केली आहे.
“वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती प्रक्रिया व तासिका तत्त्वावर (सीएचबी) कार्यरत प्राध्यापकांच्या दरमहा मानधनाबाबत बैठक झाली.
तसंच अजित पवारांनी विद्यापीठांचं आकृतीबंध तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘नॅक’ (राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषद) मानांकन असणाऱ्या महाविद्यालयांना 50 टक्के पद भरतीला परवानगी दिली जावी, गुणवत्तापूर्ण शिक्षणात कोणतीही तडजोड करु नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच प्राध्यापकांची भरती होणार आहे अशीही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.