अमळनेर (प्रतिनिधी)- येथिल पत्रकार प्रा विजय गाढे यांची मुलगी दिक्षिता ही बीएचएमएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे.नुकत्याच लागलेल्या बीएचएमएस परीक्षेत संगमनेर येथील एम एच एफ होमोपेथी कॉलेज मध्ये शेवटच्या वर्षाला शिकत असलेली दिक्षिता गाढे ही प्रथम श्रेणीत पास झाल्याने तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिक्षिता ही पत्रकार प्रा विजय गाढे व प्रा सुजाता निकम(गाढे) यांची मुलगी आहे.
तिच्या यशात डॉ राहुल निकम,डॉ मीना दामोदरे,आजी-बाबा सह सर्व नातेवाईकांचा सिंहाचा वाटा आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे खान्देश विभाग प्रमुख श्री डिंगबर महाले,जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे,अमळनेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत काटे व सर्व पत्रकार बांधवांनी तोंडभरून कौतुक केले.