तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण ठाणे महानगरपालिके अंतर्गतविविध पदांची भरती केली जाणार आहे. एकूण ५४ जागा भरल्या जाणार असून यासाठी उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित रहावे लागणार आहे.
अटेंडंट पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असावा आणि त्याला मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारांना अटेंडंट पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २० हजार रुपये इतका पगार दिला जाईल. ज्युनिअर टेक्निशियन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बॅचलर इन रेडीओलॉजीचे शिक्षण घेतलेले असावे.
उमेदवाराकडे ज्युनिअर टेक्निशियन पदाचा किमान अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार रुपये इतका पगार दिला जाईल.
ईसीजी टेक्निशियन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून फिजिक्समध्ये पदवी घेतलेली असावी. तसेच उमेदवाराकडे ईसीजी टेक्निशियन पदाचा किमान अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार रुपये इतका पगार दिला जाईल. एक्सरे टेक्निशियन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बॅचलर इन रेडीओलॉजीचे शिक्षण घेतलेले असावे.
उमेदवाराकडे एक्सरे टेक्निशियन पदाचा किमान अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार रुपये इतका पगार दिला जाईल.
पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे. सर्व पदांसाठी १४ जून रोजी मुलाखत घेतली जाणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीला येताना रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत आणणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :
पुणे महानगरपालिकामध्ये बंपर रिक्त जागा ; ‘एवढा’ पगार मिळेल
संरक्षण मंत्रालयाच्या या कंपनीत मोठी भरती ; परीक्षेशिवाय नोकरी मिळण्याची उद्याची शेवटची संधी
ग्रॅज्युएशन पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स ! IDBI बँकेत 1544 जागांसाठी भरती
10वी उत्तीर्णांनो सज्ज व्हा; उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वेत 5636 पदांसाठी बंपर भरती
पुण्यात 5वी पास ते पदवीधरांसाठी गव्हर्नमेंट जॉबची संधी, त्वरित करा अर्ज
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा