नवी दिल्ली : आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पहायला मिळत आहे. आज सोन्याचा दर तोळ्यामागे 370 रुपयांनी घसरला आहे. तर चांदी १ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.
गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचा दर (gold price) प्रति तोळा 47,750 रुपये एवढा आहे. शुक्रवारी 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48,100 रुपये इतका होता. आज 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,100 रुपये इतका आहे. तर शुक्रवारी 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,470 रुपये इतका होता. आज चांदीच्या दरात (silver rate) देखील मोठी घसरण पहायला मिळत आहे. शुक्रवारी चांदीचा दर प्रति किलो 62,700 रुपये इतका होता. आज चांदीचा दर प्रति किलो 61,700 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात आज किलोमागे तब्बल एक हजार रुपयांची घसरण झाली आहे.
हे पण वाचा :
Breaking ! राज्यात पुन्हा मास्क सक्ती, आरोग्य सचिवांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
संतापजनक ! वर्गमित्रानं केला विवाहित तरुणीवर बलात्कार
प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत ; या सरकारचा मोठा निर्णय
एकनाथ खडसेंवर ईडीची कारवाई ; भाजपच्या खा.रक्षा खडसे म्हणतात..
राज्याच्या प्रमुख शहरातील भाव
आज जारी करण्यात आलेल्या सोन्याच्या भावाप्रमाणे राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपये इतका असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,100 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,800 रुपये आहे तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,150 रुपये एवढा आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,800 रुपये आहे तर 24 कॅरट सोन्याचा दर 52,150 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 व 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा अनुक्रमे 47,800 आणि 52,150 रुपये एवढा आहे. औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,760 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,130 रुपये एवढा आहे.