मुंबई : मागच्या काही दिवसात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक असेल. वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय.
आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी यासंदर्भात पत्रातून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. बस, ट्रेन, ऑडिटोरियम, शाळा, ऑफिस, सिनेमा हॉल्स, कॉलेज, हॉस्पिटलमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. तसेच, आरोग्य सचिव व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी, आयुक्तांना पत्र लिहून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
हे पण वाचा :
संतापजनक ! वर्गमित्रानं केला विवाहित तरुणीवर बलात्कार
सेक्स करताना झाली चूक, या सेलिब्रेटीला राहावे लागले आठवडाभर हॉस्पिटलमध्ये
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 2,16,600 रुपये पगाराची नोकरी, असा करा अर्ज
यासंदर्भात लिहिलेल्या पत्रात बंदीस्त जागेत जिथं मोठ्या संख्येनं लोक एकत्र येतात, तिथं मास्क घालणं गरजेचं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत मात्र मास्क सक्ती लागू केलेली नाही, असं सांगण्यात आलं होतं. नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.