जळगाव :राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर गेल्या वर्षभरापासून ईडीची कारवाई सुरू आहे. या कारवाईवरून एकनाथ खडसे यांची सून तथा भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी प्रथमच नाराजी व्यक्त केली. खडसेंविरुद्ध ही कारवाई ईडीच्या दृष्टीने ते याेग्य असले तरी आम्हाला ही कारवाई याेग्य वाटत नाही. हा विषय न्यायालयात असल्याने जाे निर्णय येईल ताे मान्य असेल असे त्यांनी सांगितले.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या कामांची माहिती देण्यासाठी शुक्रवारी खासदार खडसे यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या कारवाई संदर्भात प्रथमच आपले मत व्यक्त केले. केंद्राला एजन्सी या नात्याने ईडीची कारवाई याेग्य वाटत असेल; परंतु आम्हाला ती मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
हे पण वाचा :
सेक्स करताना झाली चूक, या सेलिब्रेटीला राहावे लागले आठवडाभर हॉस्पिटलमध्ये
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 2,16,600 रुपये पगाराची नोकरी, असा करा अर्ज
खुशखबर.. सरकारच्या या निर्णयामुळे आता रेस्टॉरंटमध्ये जेवण स्वस्त होणार, काय आहे?
धक्कादायक ! भरदिवसा एकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न , घटना CCTV कैद
केंद्राला त्यात तथ्य वाटते त्या पध्दतीने ती कारवाई केली जाते. हा विषय न्यायालयात असून आपण न्यायालयाला मानणारे लाेक आहाेत. त्यामुळे न्यायालय जाे निर्णय देईल ताे मान्य असेल. संपत्ती जप्तीची कारवाई न्यायालयाच्या आदेशाने झाल्याचे विचारताच त्यापेक्षाही वरचे काेर्ट असल्याचे खासदार खडसे म्हणाल्या. भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस डाॅ. राधेश्याम चाैधरी, नगरसेवक विशाल त्रिपाठी, महेश जाेशी, दीपक साखरे, मनाेज भांडारकर उपस्थित हाेते.