- पाचोरा येथे आदिवासी, अल्पसंख्यांक व बेरोजगार मेळाव्यातील उपस्थितांचा सूर : विजयाचा संकल्प
पाचोरा(प्रतिनिधी) – गेल्या पाच वर्षांच्या काळात नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य सरकारने तसेच स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी रोजगार व इतर विकास कामासंदर्भात दिलेले आश्वासन पाळले नाही .नवीन रोजगार मिळणे तर सोडा पण ज्यांना रोजगार होता त्यांनाही त्यास मुकावे लागले. भरती प्रक्रिया बंद केली. त्यामुळे बेरोजगारी वाढून कौटुंबिक व सामाजिक अशांतता वाढली आहे. उद्योग ,व्यवसाय करण्याची इच्छा असूनही भांडवला अभावी ते करता येत नाही .त्यामुळे जगावे तरी कसे? असा प्रश्न उपस्थित करत आता शरद पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सत्ता प्रस्थापित करून न्याय मिळवा, रोजगार, स्वाभिमान, सन्मान व न्यायासाठी आघाडीचे उमेदवार तथा माजी आमदार दिलीप वाघ हेच एकमेव आशेचा किरण असल्याने त्यांच्या विजयासाठी संघटित प्रयत्न करा असा सूर व्यक्त करत विजयाचा संकल्प करण्यात आला .
पाचोरा -भडगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय )पीआरपी (कवाडे गट) मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार तथा माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ अनुसूचित जाती- जमाती, बेरोजगार व अल्पसंख्यांक बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. महालपुरे मंगल कार्यालयात झालेल्या आदिवासी भिल्ल समाज बांधव व बेरोजगारांच्या मेळाव्यास आघाडीचे उमेदवार दिलीप वाघ, संजय वाघ, जि प सदस्य स्नेहा गायकवाड, प्राचार्य डॉ एन एन गायकवाड, नितीन तावडे, विकास पाटील, अझहर खान, एकलव्य संघटना, एकता परिषद, दलित हक्क संघर्ष ,आदिवासी भील संघटना, अनुसूचित जाती -जमाती संघटनेचे धर्मा भिल ,अरुण सोनवणे (वलवाडी ),एकनाथ अहिरे ,किशोर डोंगरे ,आकाश सोनवणे ,दादा सोनवणे ,सतीश भिल ,नामदेव सोनवणे, प्रताप सूर्यवंशी, सतीश चौधरी ,खलील देशमुख, संजय एरंडे, भूषण वाघ, वासुदेव महाजन ,योगेश पाटील,अॅड अविनाश सुतार, प्रकाश भोसले, प्रा माणिक पाटील, शांताराम चौधरी, भागवत मिस्तरी, भगवान मिस्तरी, रणजीत पाटील, भुषण पाटील, सतीश गोसावी, किरण पाटील, पंकज पाटील, नितीन रोकडे, हर्षल पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच अरुण सोनवणे, स्नेहा गायकवाड ,एकनाथ अहिरे, किशोर डोंगरे, आकाश सोनवणे यांनी आदिवासी भिल्ल समाजाच्या प्रलंबित समस्या मांडल्या. शिवाजी ढवळे यांनी समाजाची दिशाभूल व विश्वासघात करून केवळ आपला स्वार्थ साधला. आदिवासींचे हक्क वन जमिनीबाबतचे अधिकार, जातीचे दाखले, रोजगार, शिक्षण या संदर्भात युती सरकारने कोणतेही ठोस धोरण न राबवता समाजाचे शोषण केल्याचा आरोप करण्यात आला .विकासाच्या नावाखाली वाडा ,वस्ती भकास करण्यात आली .बहिर्जी नाईकांचे स्मारक का होत नाही? असा प्रश्न उपस्थित करून सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले .
बेरोजगार मेळाव्यात पंकज पाटील, धनराज पाटील, माणिक पाटील, भुषण पाटील ,नितीन रोकडे, हर्षल पाटील, अझहर खान ,विकास पाटील यांनी संतप्त भावना मांडल्या. भरती प्रक्रिये साठीचे महा व पवित्र पोर्टल हा देशातील नव्हे तर जगातील महाघोटाळा असून भाजप-सेना युतीची सत्ता गेल्याशिवाय हा घोटाळा उघड होणार नाही. बेरोजगारांना न्याय व स्वाभिमान मिळणार नाही. महागडे शिक्षण घेऊन रोजगार नाही. कॉन्ट्रॅक्ट बेस वर कामे दिली जातात .नवीन रोजगार तर नाहीत उलट आहे त्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. शेतकरी पुत्रांनी शेतीच करावी असे राज्यकर्ते सांगतात शिवरायांचे नाव घेऊन अन्यायकारक सत्ता भोगतात. स्टार्ट अप इंडिया, मुद्रा लोन हे फसवे आहे. शासनच शोषक झाले आहे. 370कलम, सर्जिकल स्ट्राइक, पुलवामा हल्ला यामुळे पोट भरणार नाही व न्याय मिळणार नाही. रोजगार, स्वाभिमान, सन्मान व न्याय यासाठी शरद पवारांचे हात बळकट करा. तोंड, जीभ व पायाची शस्त्रक्रिया झालेली असताना 80 वर्षांचे पवार तरुणा प्रमाणे राज्य पिंजून काढत आहेत त्यांचे हाती सत्ता द्या त्यासाठी पाचोरा -भडगाव मतदार संघात दिलीप वाघ हेच आशेचा किरण असून त्यांच्या विजयाचा एकमुखी संकल्प करण्यात आला. बाहेरपूरा भागातील ए वन हॉलमध्ये अल्पसंख्यांकांचा मेळावा झाला गफ्फार मलिक अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी दिलीप वाघ ,खलील देशमुख, नितीन तावडे, विकास पाटील ,रणजित पाटील, अझहर खान, सत्तार पिंजारी ,शेख रसुल, जमील सौदागर, बशीर बागवान, हारुण देशमुख, अश्फाक बागवान, किशोर डोंगरे ,हाफिज खान ,रशीद मन्यार,आसम बाबू ,इसामोद्दीन खान, मुस्ताक मन्सूरी, सय्यद सलाम इमाम, मोहम्मद मिस्तरी, एजाज शेख, रज्जू बागवान, कासम खान, रशीद मन्यार, मोहम्मद लखारी, सय्यद तारीक, सलीम खान, शाहीर शेख, मोहसीन टकारी ,आरिफ टकारी ,सलीम खान, जावेद खान, सलीम शहा ,हरून बागवान, शेख युसुफ ,शेख शाकीर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड अमजद पठाण, इरफान मन्यार, डिगंबर पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अल्पसंख्यांकांचा युती शासनाने विश्वासघात केला असे स्पष्ट करून अल्पसंख्यांकांच्या न्याय व हक्कासाठी महाआघाडीचे दिलीप वाघ यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी दिलीप वाघ यांनी शहर व ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य यासंदर्भात आमदारांनी राबविलेल्या धोरणावर टीका केली .ताजिद कुरेशी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले अझहर खान यांनी आभार मानले.